किशोर साहू, मौदा :- गट ग्रा पं तोंडली येथे जागतिक महिला दिन सप्ताह सुरू असून त्या निमित्य या गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सुकळी( देव) येथे बुधवार (ता.11 मार्च)ला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण , पूजाअर्चना व त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच दर्शना प्रमोद बागडे, उपसरपंच रामपाल धांडे, ग्रामपंचायत सदस्यगण सिंधू नरेंद्र नकोरिया, सुषमा सुनील बाभरे, विक्की वामन आस्वले, तंटामुक्ती अध्यक्ष रूपचंद बाभरे, पोलीस पाटील शुभम सारवे, अंगणवाडी सेविका कल्पना वैद्य , वर्षा रामटेके (खिडकी), सीआरपी राजकुमारी कछवा, आशा वर्कर दयावंती आस्वले ,ग्राम संघाच्या अध्यक्षा पल्लवी आस्वले सह गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




