spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जुनी कामठी पोलिसांनी वारेगाव रोडवर टाकला छापा

– जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक, ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कामठी :- जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारेगाव रोडवरील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून चार आरोपींना रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६१,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२४ रोजी रात्री ८:२५ ते १०:३० च्या सुमारास वारेगाव रोडवरील गोपाल यादव यांच्या शेतात काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे जुनी कामठी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम,पोलीस शिपाई विवेक दोरसेटवार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीं मध्ये

१) योगेश दिनेश भांडारकर (३१, रा. गंगा जमुना, नागपूर)

२) गोपाल उर्फ गोलू गिरीशंकर वर्मा (३६, रा. सोनारओली, कामठी)

३) प्रशांत केशुकुमार शर्मा (४२, रा. कांदरी, कन्हान)

४) कैलास किशनराव डोंगरे (४७, रा. कुंदनलाल गुप्ता नगर, नागपूर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडून एकूण ३८,०४० रुपये रोख, २३,००० रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन (विवो, वन प्लस, ओप्पो), स्टीलचा डबा, दरी आणि ताश पत्ते असा एकूण ६१,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर आरोपींविरुद्ध कलम १२ महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles