spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एसबीआय एटीएम केंद्र बिल्डिंग ला आग

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हरदास नगर रहिवासी मंगेश लाखे यांच्या बिल्डिंग मध्ये खालच्या माळ्यात एस बी आय चे एटीएम केंद्र असून वरील माळ्यावर भाड्याने वास्तव्य करीत असलेल्या मेट्रो कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे बिल्डिंग ला आग लागल्याची घटना आज दुपारी 3 दरम्यान घडली असून या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली मात्र घरसाहित्याचे जळून नुकसान झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळ चे बिल्डिंग मालल मंगेश लाखे हे नागपूरला राहत असल्याने सदर बिल्डिंग भाड्याने दिली आहे त्यानुसार बिल्डिंग च्या वरील माळ्यातील एका खोलीत भाड्याने वास्तव्य करीत असलेल्या मेट्रो च्या काही कामगारांनी दुपारचे जेवण करून बिडी ओढत जळती काडी एका कडेला फेकली मात्र ती जळती काडी गादीवर पडल्याने अचानक आग लागली या आगीने रौद्र रूप धारण करीत आगीचे धुके घराबाहेर निघताच शेजारील नागरिकात भीतीमय वातावरण निर्माण झाले होते.वेळीच शेजारी राहणारे तुषार नागसेन सुखदेवें यांनी नगर परिषद व जुनी कामठी पोलीस स्टेशन तसेच नगरसेवक ला माहिती दिली असता नगरसेवक काशीनाथ प्रधान,पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले यांनी त्वरित घटनास्थळ गाठून अग्निशमन दल च्या वाहणाच्या साहाय्याने आग विझविण्यात यश गाठले. या आगीत घरातील गादी ची राखरांगोळी झाली .

Popular Articles