कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा शिवारातील वारसी इन मार्ट नामक लाकूड कंपनिला काल मध्यरात्री 3 दरम्यान अचानक आग लागल्याने या आगीत 30 ते 40 लक्ष रुपये किमतीचे लाकूड साहित्य जळून खाक झाले.आगीचे कारण कळू शकले नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळ कंपनीत चार मजूर झोपेत असता अचानक आग लागली असता सर्वत्र धावपळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महेश आंधळे ,सरपंच पंकज साबळे आदी पोहोचले असता आगीने घेतलेले रौद्र रूप पाहून त्वरित अग्निशमन वाहन बोलावून बरेच वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश गाठले .सुदैवाने जीवितहानी टळली .ही आग विझविण्यात महादुला निखिलेश वाडेकर फायर ऑफिसर ,येरखेडा तुषार सुखदेवे, फायर ऑफिसर कन्हान कामठी हर्षल दहाट फायर ऑफिसर यांनी मोलाची भूमिका साकारली.




