– इन्स्पायर्ड अवॉर्ड ( 2025 – 26) मध्ये पीएम श्री जि प शाळा दहेगाव च्या विद्यार्थ्यांची निवड
किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथील विद्यार्थिनी स्वरा विजय हटवार वर्ग 6 वा आणि कु.मानवी सुरेश हटवार वर्ग 7 वा या दोन्ही विद्यार्थ्यिंनी चे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आफ इंडिया या विभागामार्फत राबविलेल्या इंन्स्पायर्ड अवार्ड सन 2025-2026मध्ये निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल त्या दोन्ही विद्यार्थिनींची आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक सुधीर खंडाईत यांचे मुख्याध्यापक वासुदेव भुते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे,उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.
स्वरा विजय हटवार या विद्यार्थिनीने मल्टीपर्पज किचन हेल्पर बोर्ड हा प्रोजेक्ट तयार केला .या प्रोजेक्ट मध्ये स्वयंपाक बनविण्यासाठी भाजीपाला कापण्यासाठी सोईचा बोर्ड म्हणून कसा वापर करता येईल, याची माहिती दिली आहे .त्यांचे गुणदोष वैशिष्ट्ये आपल्या प्रोजेक्टमध्ये सादर केले. तसेच मानवी सुरेश हटवार या विद्यार्थ्यांनीने पब्लिक युरिन कलेक्शन फार फर्टीलायझर हा प्रोजेक्ट इन्स्पायर मध्ये सादर केला.या प्रोजेक्ट मध्ये मानवी मुत्रांचा खत म्हणून वापर कसा करता येतो ,याची माहिती या प्रोजेक्ट दिलेली आहे.दोन्ही विद्यार्थ्यांनी इन्स्पायर अवार्ड मध्ये प्रोजेक्ट ची माहिती ,त्याचा फायदा आणि तोटा त्या ठिकाणी सांगितले आहे .या दोन्ही प्रोजेक्टची इन्स्पायर अवार्ड मध्ये सन 2025-2026 साठी निवड झालेली आहे .
या दोन्ही विद्यार्थ्यांनी जी माहिती सादर केली याची सर्व माहिती विज्ञान शिक्षक सुधीर खंडाईत यांच्या विशेष मार्गदर्शनाने या छान अशी तयारी केली आणि त्याचाच परिणाम म्हणून स्वरा विजय हटवार आणि मानवी सुरेश हटवार या विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवार्ड मध्ये निवड झालेली आहे.
याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद लीलाधर काळबांडे, सुधीर कांबळे , राजेश रोहाड , सुधीर खंडाईत , सुजाता बोदेले , प्रज्ञा रामटेके , संगीता आंबिलढुके , उमेश उके ,पुष्पलता उके, कैलास फटिंग, शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य, सदस्या उपस्थित होते. त्यांनी सुद्धा अवॉर्ड साठी निवड झालेल्या दोन्ही विद्यार्थिनी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.




