नागपूर :- स्व.सखारामजी चौधरी यांचा ३० व्या स्मृतीदिनी, झेंडा चौक महाल नागपूर परिसरातील शहीद शंकर महाले स्मारक समितीचे सभागृहात समितीचे आणि राष्ट्रीय शिवाजी मंडळाच्या तर्फे माजी महापौर सखारामजी चौधरी यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी नागपूरच्या महापौर निता राजेंद्र ठाकरे यांनी महापालिका व नगरीच्या वतीने आदरांजली वाहिली. तसेच मंडळाचे अध्यक्ष ओंकार राऊत, सचिव गणेश वांढरे, सहसचिव नितीन चौधरी, समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध धारकर, सचिव शेषराव दुरगकर, सहसचिव मनोज वढुळकर, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर विजय वाटकर, काॅंग्रेस कमिटीचे अशोक निखाडे, समाजसेवक विनोद इंगोले, राजेश हडप, प्रकाश भिसे, देविदास अवचट, गंगाधर घुबे, विजय लुटे, राजू रामटेके, सतीश दिक्षित, विनोद कनकदंडे, समाजातील सन्माननीय नागरिक उपस्थित होते. शेवटी महापौरांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.
झेंडा चौक महाल येथील माजी महापौर स्व. सखारामजी चौधरींना महापौर निता ठाकरेंच्या हस्ते विनम्र आदरांजली









