spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोरवाल महाविद्यालयात महान चक्रवर्ती सम्राट अशोकाची जयंती उत्साहात साजरी

कामठी :- महाविद्यालयाच्या स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा करीत असलेल्या स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या, विशेष दिवस कार्यक्रम समिती आणि इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने, चैत्र शुक्ल अशोकाष्टमीच्या दिवशी महान चक्रवर्ती सम्राट अशोकाची जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत महान चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आणि दिप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रम समन्वयक आणि इतिहास विभागाचे प्रमुख, डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा संदर्भ देत सांगितले की, “महान चक्रवर्ती सम्राट अशोकाने आपल्या बलाढ्य साम्राज्याच्या शिखरावर असतांना दिग्विजयाचे धोरण सोडून धम्मविजयाचे धोरण स्वीकारले. बुद्धाच्या ह्याच धर्मविजयाची आज जगाला गरज आहे.” कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा॰ डॉ. स्वप्नील दाहात यांनी सम्राट अशोकाच्या लोककल्याणकारी कार्यांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शावर चलण्याचे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवर्ती, डॉ.रेणू तिवारी, डॉ.जयंत रामटेके, डॉ.इफ्तेखार हुसेन, आयक्यूएसी समन्वयक डॉ.प्रशांत ढोंगले, डॉ.सिद्धार्थ मेश्राम, डॉ.तुषार चौधरी, डॉ.जयश्री थावरे, डॉ.विनो राणा, डॉ.विनो शेड, डॉ. जळक, डॉ.आशा रामटेके, डॉ.महेश जोगी, डॉ.विकास कामडी, डॉ.मंजिरी नागमोते, डॉ.धम्मदीना बोरकर, यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेश धोंगले, संचालन मितेश चहांदे यांनी केले तर आभार सौरभ रहाटे यांनी मानले.

Popular Articles