काटोल :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, धरती मुर्ती रोडवरील योगेश देशभ्रतार यांचे शेतामध्ये काही इसम यांनी अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंश जनावरांना एकत्रित बांधून ठेवलेले आहे. तसेच त्या ठिकाणावरून जनावरांना चार चाकी वाहनांमध्ये भरून नेणार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मा. श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या माहीतीच्या आधारे तात्काळ धरती मुर्ती रोडवरील योगेश देशभ्रतार यांचे शेताजवळ सापळा रचला. शेताच्या काही अंतरावर पोलीसांनी नाकाबंदी केली असता त्यांना मारूती सुझुकी अर्टीगा कार क्र. एम एच १४ डी एन ७०६४ है वाहन मिळुन आले. नमुद वाहन चालकाने पोलीसांना पाहुन वाहन सोडुन पळ काढला. सदर वाहन गोवंश जनावरांना वाहुन नेणाऱ्या वाहनांचे पायलटींग करून त्यांना महीती देत असल्याचे समजले. त्यानंतर काही वेळाने पिकअप क्र. एम एच ३० वी डी २३४८ आणि महेंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच २७ एक्स ८२१२ हे दोन वाहन शेतातुन बाहेर आले. नमुद वाहन चालकांनी पोलीसांनी पाहुन त्यांच्या ताब्यातील वाहने न थांबविता निघुन गेले. पोलीसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता आरोपींनी वाहने सोडुन जंगलात पळ काढला. पोलीसांनी जंगलात पाठलाग करून शिताफिने एका आरोपीला पकडुन नाव पत्ता विचारले असता आरोपी नामे रिजवान खान हारुण खान, वय २४ वर्षे, रा. लालखडी अमरावती अशी माहीती त्यांना प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष वाहने तपासली असता महेंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच ३० बी डी २३४८ मध्ये ११ गोवंश तसेच महेंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच २७ एक्स ८२१२ मध्ये १३ गोवंश जनावरे मिळुन आली. दोन्ही वाहनातील गोवंश जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, अंत्यत कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन निर्दयतेने वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले.
आरोपी नामे रिजवान खान हारुण खान याच्या कडे कौशल्यपुर्ण तपास करून जनावरे कोठुन आणली असे विचारले असता त्यांनी धरती मुर्ती रोडवरील योगेश देशभ्रतार यांचे शेतामध्ये नेले पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे ४६ गोवंश जनावरे बांधलेली होती. तसेच जनावरे वाहतुकी साठी लागणारे महेंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच ४० बी जी ३३०९ किंमती त्यासोबतच दुचाकी वाहन हिरो होंडा स्प्लेंडर एम एच ३१ ए के ८२८१ आणि हिरो होंडा पेंशन एम एच ४० एच २९६५ ही वाहने मिळुन आली.