बुटीबोरी :- बोरी पोलीसांना गुप्त बामीदाराद्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन बुटीबोरी अंतर्गत मौजा रुईखैरी येथील आरोपी १) रणजीत बलदेव सिंग ठाकूर, वय ४९ वर्ष (२) रोशन कन्नूलाल यादव, वय ४० वर्ष, दोन्ही रा. पुलगाव, ता. देवळी, जिल्हा वर्धा (३) मोहम्मद अकलीम मोहम्मद अस्लम शेख, रा. रुईखैरी यांनी आपले घरी स्वतःचे फायदया करीता अनाधिकृत विनापरवाना अत्यावश्यक वस्तु डीझेल चा साठा करून ठेवला आहे. अशी माहीती प्राप्त होताच बुटीबोरी पोलीसांनी हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण आणि भाग्यश्री धिरबस्सी, उपविभागिय पोलीस अधिकारी, नागपुर उपविभाग यांच्या मार्गदर्शनात कारवाई करत पोलीस पथकाने मौजा रूईखैरी येथे पोहचुन धाड टाकली असता आरोपी नामे १) रणजीत बलदेव सिंग ठाकूर, वय ४९ वर्ष (२) रोशन कन्नूलाल यादव, वय ४० वर्ष, दोन्ही रा. पुलगाव, ता. देवळी, जिल्हा वर्षा (३) मोहम्मद अकलीम मोहम्मद अस्लम शेख,रा. रुईखैरी यांच्या घरी अवैधरीत्या विनापरवाना प्लास्टिक कॅन मध्ये अत्यावश्यक वस्तु डिहोलचा साठा केलेला मिळून आले.
पोलीसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून २० लिटर क्षमतेच्या ९५ प्लास्टिक कॅन मध्ये एकूण १९०० लिटर डिझेल किंमती १,९०,०००/- रुपये व साहित्य असा एकूण १,९४,५५०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी क्रमांक १ व २ यांना अटक करण्यात आहे.
नमुद प्रकरणी तिन्ही आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे कलम ७, ३ अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ अन्वये सहकलम ८(१) पेट्रोलियम अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.