कामठी :- भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेत भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून अत्यंत मानाचे प्रभू स्थान आहे .दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला रामनवमीचा पवित्र सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जातो हा दिवस केवळ भगवान श्रीराम यांचा जन्माचा उत्सव नसून त्यांच्या आदर्श जीवन मूल्याना अंगीकारण्याचा प्रेरणादायी क्षण असून मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम हे केवळ धार्मिक प्रतीक नसून आदर्श जीवनशैलीचे मार्गदर्शक आहेत .राम नवमीच्या या पवित्र निमित्ताने आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शाचा अवलंब करून एक आदर्श समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करूया असे मौलिक मत कामठी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी प्रभू श्रीराम जन्मोत्सव निमित्त येथील राम मंदिर व सीता राम मंदिर येथे प्रभू श्रीराम पूजा अर्चना करते प्रसंगी व्यक्त केले तसेच समस्त नगरवासीयांच्या सुख समृद्धी व मंगलमय जीवनाची मनोकामना केली.
पुढे नगराध्यक्ष अजय अग्रवाल म्हणाले की भगवान श्रीराम यांचे जीवन सत्य,धर्म , कर्तव्यनिष्ठा आणि आदर्शांचे उत्कृष्ट उदाहरण आहे.ते राजपुत्र असूनही अत्यंत साधेपणाने जीवन जगले आणि प्रत्येक परिस्थितीत मर्यादा पाळली ते आदर्श पुत्र,आदर्श भाऊ,आदर्श पती व आदर्श राजा म्हणून ओळखले जातात .
पित्याच्या वचनपूर्तीसाठी त्यांनी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला जो त्याग समर्पण आणि कर्तव्यभावणेचा सर्वोच्च आदर्श आहे.आजच्या आधुनिक युगात जिथे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होताना दिसतो तिथे भगवान श्रीरामांचे विचार आणि आदर्श अधिक महत्त्वाचे ठरतात.त्यांनी समाजात समानता ,प्रेम आणि करुणेचा संदेश दिला. आजच्या समाजात वाढत चाललेला तणाव , असमानता आणि संघर्ष यावर मात करण्यासाठी प्रभू श्रीरामांचे विचार मार्गदर्शक ठरतात.
याप्रसंगी नायडू, बरबटे, ठाकुर, स्मिता नायडू, उज्वल रायबोले, कपिल गायधने, गोपाल सीरिया, आशु अवस्थी, कुणाल सोलंकी, विजय कोंडुलवार, अथर्व पिंगले, कृष्णा खंडेलवाल, निकुंज अग्रवाल, पीयूष शर्मा, अभय गुप्ता, निखिल शर्मा सहित इतर मान्यवर उपस्थित होते.








