spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने कामठीत श्री राम कथेचे आयोजन

कामठी :- श्री हनुमान जन्मोत्सवाच्या अनुषंगाने श्री तीर्थक्षेत्र गंज के बालाजी मंदिर ट्रस्ट कामठी च्या वतीने गांधी चौक कामठी येथील श्री हनुमानजी यांच्या मुख्यमूर्ती समोर शूक्रवार 27 मार्च ते 2 एप्रिल 2026 पर्यंत सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत श्री राम कथा चे आयोजन करण्यात आले आहे.या श्रीराम कथेत राष्ट्रीय कथा वाचक पंडित राजेंद्र सरकार (प्रयागराज ) श्री राम कथा वाचन करतील.या कार्यक्रमाची व्यवस्था सहयोगी म्हणून श्री गायत्री परिवार कामठी, निंबाजी सामाजिक कौशल्य विकास संस्था कामठी,जय शक्ती बिछायत केंद्र कामठी ,श्री ओंमकारेश्वर मंदिर गणेशोत्सव मंडळ कामठी मोलाची भूमिका साकारत आहेत व 3 एप्रिल ला दुपारी 3 वाजता श्री हनुमान जन्मोत्सव भव्य शोभायात्रा निघणार आहे.तेव्हा सर्वांनी आयोजित श्री रामकथेत व श्री हनुमान जन्मोत्सव शोभायात्रेत सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकानी केले आहे.

Popular Articles