नागपूर :- कुँवारा भिवसन खोरी पेनठाणा, सेवादल नगर महिला मंडळाच्या वतीने आयोजीत कुँवारा भिमालपेन जन्मोत्सव बुधवार दिनांक २ एप्रील पासून सुरू होत आहे. सायंकाळी कलश स्थापना करण्यात येईल. पालखी यात्रा कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी ३ एप्रील ला सकाळी १० वाजता तसेच गोगो पूजा, सप्तरंगी ध्वजारोहण व भव्य महाप्रसादाचे आयोजन केलेले आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी कुँवारा भिमालपेन पेनठाणा सेवादल नगर, मानेवाडा नागपूर येथे उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सेवादल नगरातील महिला मंडळानी केले आहे.








