spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

देखभाल व दुरुस्ती कामांमुळे आज कॉग्रेसनगर विभागात वीज नाही

नागपूर :- रोजी अत्यावश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या तांत्रिक कामांमुळे शहरातील अनेक वस्त्यांचा वीजपुरवठा अडीच ते तीन तासांसाठी बंद राहणार आहे. उन्हाळ्याची चाहूल लागत असताना होणाऱ्या या वीज कपातीमुळे नागरिकांनी आपली कामे नियोजित वेळेत आटोपून घ्यावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

या कामांमुळे सकाळी 8 ते 11 या वेळेत हिल टॉप, पांढराबोडी, बाजी प्रभू नगर. सकाळी 8:30 ते 11:30 या वेळेत खामला, खामला जुनी वस्ती, गणेश अपार्टमेंट, व्यंकटेश नगर, कोतवाल नगर, सिंधी कॉलनी, नेल्को सोसायटी, प्रताप नगर, शिव एनगर, मिलिंद नगर बौद्धविहार. सकाळी 8:30 ते 12 या वेळेत आरपीटीएस आणि लक्ष्मीनगर आणि सकाळी 9 ते 12 या वेळेत सुभाष नगर, नेल्को सोसायटी, जोशी लेआउट, कामगार कॉलनी, तुकडोजी नगर, शास्त्री लेआउट, हिंगणा रोड, विवेक हॉस्पिटल, पटेल लेआउट, हिंगणा टी-पॉइंट, हिंगणा टी-पॉइंट बौद्ध विहार, टाकळी सिम, अरिहंत आर्केड, मंगलधाम सोसायटी, गोदावरी अपार्टमेंट, विघ्नहर्ता अपार्टमेंट, जलतरंग सोसायटी, क्लासिक गगन अपार्टमेंट या भागातील वीज पुरवठा बंद राहील

पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी आणि यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही देखभाल दुरुस्ती अनिवार्य आहे. वीज पुरवठा खंडित राहणाऱ्या वेळेची नोंद घेऊन ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Popular Articles