spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लेख – 10 वी / 12 वी नंतर योग्य करिअर कसं निवडावं ?

– परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. “आता पुढे काय कराव?”

आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य करिअर निवडणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीचा निर्णय घेतल्यास पुढे अडचणी येऊ शकतात, म्हणून विचारपूर्वक आणि योग्य मार्गदर्शनाने निर्णय घेणं आवश्यक आहे.

सर्व प्रथम स्वतःला ओळखा (Self-Assessment)

प्रथम आपल्या आवडी-निवडी, क्षमता आणि गुण ओळखणं गरजेचं आहे.

तुम्हाला कोणत्या विषयात रस आहे? कोणत्या गोष्टी करताना आनंद मिळतो? यावरूनच योग्य क्षेत्र निवडता येतं.

विविध पर्यायांची माहिती घ्या

आज केवळ पारंपरिक क्षेत्रांपुरतं मर्यादित न राहता अनेक नवीन करिअर पर्याय उपलब्ध आहेत.

जसं की, डिजिटल मार्केटिंग, सायकोलॉजी, डिझाइन, डेटा सायन्स इत्यादी.

प्रत्येक क्षेत्राची माहिती घेऊनच निर्णय घ्या.

पालक आणि तज्ञांचा सल्ला घ्या

करिअर निवडताना पालकांचा अनुभव आणि तज्ञ (Counselor) यांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरतं.

यामुळे योग्य दिशा मिळते आणि चुकीचे निर्णय टाळता येतात.

 तुलना करू नका

इतर मित्रांनी कोणता पर्याय निवडला यावरून निर्णय घेणं चुकीचं आहे.

प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, त्यामुळे तुमच्या स्वतःच्या ताकदीनुसार मार्ग निवडा.

तणावमुक्त राहा

निकालाच्या काळात तणाव वाढणं स्वाभाविक आहे. परंतु शांत राहून, सकारात्मक विचार करून पुढचं पाऊल टाका. योग्य करिअर निवडणं म्हणजे केवळ नोकरी मिळवणं नाही, तर आनंदी आणि समाधानकारक आयुष्य जगण्याचा मार्ग निवडणं आहे. म्हणून घाई न करता, योग्य माहिती आणि मार्गदर्शनाच्या आधारे निर्णय घ्या.

– कल्याणी नंदेश्वर,कौन्सलर ऑड सायकोथेरेपिस्ट

(कल्याण कौन्सलिंग ऑड सायकोथेरेपी क्लिनीक)

Popular Articles