-अवैध दारूविक्रीकडे स्थानिक पोलिसांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष
-कामठीत चहापुर्वीच मिळतो दारूचा घोट
कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानल्या जाणाऱ्या कामठी तालुक्यातील शहराचा भाग हा नागपूर शहर पोलीस आयुक्तालय विभागात समावेश असून ग्रामीणचा बहुतांश भाग अजूनही ग्रामीण पोलिस विभागाशी जोडलेला आहे . तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात जोम आला असून पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध देशी दारू विक्री ची दुकानात सकाळी 7 वाजेपासून च विक्री होत असल्याने या दारूच्या व्यसनाला बळी पडलेली तरुणांई नशेच्या खाईत जाऊन स्वतःचे जीवन उधवस्त करीत आहे तर पोलीस मात्र फक्त स्वतःची झोळी भरण्यात धन्य आहे. यामुळे कामठी तालुक्यात ‘चहापूर्वीच मिळतो दारूचा घोट ‘ या चर्चेला उधाण आहे.तेव्हा पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांच्या माध्यमातुन या अवैध दारू विक्रीवर लगाम लागनार का?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करोत आहेत.
येथील अवैध दारू विक्रेत्यांना राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असून काही भ्रष्ट पोलिसांना देत असलेल्या चिरीमिरीमुळे पोलिसांचा अभयपणा तयार झाला आहे ज्यामुळे हे अवैध दारू विक्रेते मुजोर झाले असून अवैध दारु विक्रेते बिनधास्तपने वस्ती वस्तीत अवैध दारू विक्री करीत आहेत. यामुळे तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त होत असून तरुण नैराश्येच्या गर्तेत जात आहेत.या अवैध दारू विक्रेत्यांनी वस्ती वस्तीला पोखरले असून या अवैध दारू विक्रेत्याची मुजोरी वाढली आहे.
कामठी शहरातील बहुधा भागात अवैधरित्या देशी दारु विक्री चा व्यवसाय सुरू असून रात्री कितीही वाजता गेले तरी यांच्याकडून दारू चा घोट मिळत असतो तर पहाटे पासूनच बिनधास्त पणे दारू विक्री करीत असल्याने जणू काय पोलिस विभागाने यांना परवाना दिला असेल असे परवानाधारक दारूविक्रेते असल्याचे गृहीत धरून दारू विक्री करोत असतात तर या दारूच्या आहारी गेलेले कित्येक तरुण मंडळी सकाळी उठून चहा घेण्यापेक्षा आधी या दुकानातून दारूचा घोट प्यायला जाऊन मनसोक्त करीत स्वतःच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत तर दुसरीकडे पोलीस दादा या अवैध दारू व्यावसायिकासोबत अर्थपूर्ण संबंध ठेवून पाठराखण करीत अप्रत्यक्ष दारू विक्रीचा परवाना दिल्याचे वर्तन करीत आहेत.तेव्हा या अवैध दारू व्यवसायिकांच्या मुसक्या बांधणार कोण? असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

