Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मध्य भारतातील रुग्णांना मिळणार अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशलिटी सुविधा

· डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प

· सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते भूमिपूजन

· जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा

· हेलीपॅड व एअर ॲम्बुलन्स ची सुविधा

नागपूर :- जागतिक दर्जाच्या व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले सुसज्ज अशा 461 बेडची सुविधा असलेल्या नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट या मध्य भारतातील अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते एका विशेष समारंभात झाले.

धरमपेठ येथील नॉर्थ अंबाझरी मार्गावरील डॉ. आबाजी थत्ते सेवा अनुसंधान संस्थेच्या वतीने हा वैद्यकीय प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, सचिव शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर आदी यावेळी उपस्थित होते.

नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट ही मध्य भारतातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक मल्टी स्पेशलिटी व सुपर स्पेशलिटी संस्था म्हणून सुरू होत असून 23 मजली सुसज्ज इमारत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये हेलिपॅड ची सुविधा असून एअर ॲम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होणार आहे. अत्याधुनिक उपचारांच्या सुविधांसोबतच अवयव प्रत्यार्पण व बर्न वॉर्ड राहणार असून 461 बेडची सुविधा तसेच रुग्णांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे संस्थेचे सचिव शैलेश जोगळेकर यांनी यावेळी सांगितले. अवयव प्रत्यारोपण सुविधेवर विशेष भर दिला जाणार आहे.

सिंगापूरच्या एस के या जागतिक दर्जाच्या वास्तू विशारद संस्थेतर्फे हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे येथे मेडिकल प्लॅनिंग आर्किटेक ला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

नॅशनल हेल्थकेअर इन्स्टिट्यूट सुमारे पाच लाख चौरस फूट क्षेत्रावर उभारले जाणार असून नागपूर परिसर तसेच मध्य भारतातील रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पाची संकल्पना करण्यात आली आहे. येथे मल्टीस्पेशालिटी तसेच सुपर स्पेशलिटी अंतर्गत जेरियाट्रिक रूमेट्रोलॉजी, हृदय व रक्तवाहिन्या, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी, क्रीडा वैद्यक प्लास्टिक व पुनर्रचना आदी सुविधा राहणार आहेत. या संस्थेमध्ये पदव्युत्तर व सुपर स्पेशलिटी अभ्यासक्रमासाठी पूर्ण सुसज्ज शैक्षणिक सुविधा असतील अशी माहिती संस्थेचे सचिव शैलेश जोगळेकर यांनी दिली.

प्रारंभी नॅशनल हेल्थकेअर इन्स्टिट्यूट या संस्थेचे भूमिपूजन सर संघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रस्तावित इमारतीच्या प्रतिरूप तसेच कोणशिलेचे अनावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत संस्थेचे अध्यक्ष अँड. सुनील मनोहर, सचिव शैलेश जोगळेकर व कोषाध्यक्ष आनंद औरंगाबाद यांनी केले. या कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील तसेच विशेष निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मेघा दीक्षित यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.