Tuesday, April 28, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनगणना 2026: नागरिकांना घरबसल्या करता येणार ‘सेल्फ-एन्युमरेशन’

– जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे आवाहन 

हंसराज भंडारा :- जनगणना 2026 साठी भारत सरकारने नागरिकांना मोठी सुविधा दिली आहे. आता प्रत्येक कुटुंबाला मोबाईल किंवा संगणकाद्वारे घरबसल्या जनगणनेची माहिती स्वतः भरता येणार आहे. यासाठी ‘सेल्फ-एन्युमरेशन’ पोर्टल https://se.census.gov.in सुरू करण्यात आले असून त्याची संपूर्ण प्रक्रिया जनगणना आयुक्त कार्यालयाने जाहीर केली आहे. यांचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली.

सेल्फ-एन्युमरेशनची प्रक्रिया 4 विभाग व 9 स्टेप्समध्ये विभागली आहे. पहिल्या टप्प्यात पोर्टलवर लॉगिन करून राज्य निवडावे लागेल. त्यानंतर कुटुंबप्रमुखाचे नाव, 10 अंकी मोबाईल नंबर व ई-मेल (ऐच्छिक) भरून नोंदणी करावी लागेल. एका मोबाईल नंबरवरून एका कुटुंबाची नोंदणी होणार असून कुटुंबप्रमुखाचे नाव व भाषा एकदा निवडल्यानंतर बदलता येणार नाही.

दुसऱ्या टप्प्यात ओटीपीद्वारे पडताळणी होईल. जिल्हा, पिन कोड, गाव/शहर भरल्यानंतर नकाशावर लाल मार्करद्वारे घराची अचूक जागा निश्चित करावी लागेल. तिसऱ्या टप्प्यात Houselisting व Housing Census ची प्रश्नावली भरून Preview मध्ये सर्व माहिती तपासावी लागेल. ‘Final Submit’ केल्यानंतर 11 अंकी SE ID (H ने सुरू होणारा) SMS व ई-मेलवर मिळेल.

गणक आल्यावर SE ID दाखवा

चौथ्या व अंतिम टप्प्यात जनगणनेचा कर्मचारी घरी भेट देण्यासाठी येईल तेव्हा त्याला SE ID दाखवावा लागेल. SE ID जुळल्यास माहिती कन्फर्म होईल, अन्यथा कर्मचारी नव्याने माहिती गोळा करतील.

‘Final Submit’ नंतर बदल नाही

जनगणना अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, एकदा ‘Final Submit’ केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी माहिती काळजीपूर्वक भरावी. ड्राफ्ट सेव्ह करून नंतर सबमिट करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.

या डिजिटल सुविधेमुळे जनगणनेचे काम जलद, पारदर्शक व अचूक होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने Self-Enumeration करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केली आहे.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे, जनगणना विभागाचे रवीसागर पटेल, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.