Wednesday, April 29, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी तालुक्यात 1 ते 15 मे पर्यंत स्व-गणना – तहसिलदार गणेश जगदाडे

– स्व-गणना करण्याचे नागरिकांना प्रशासनाचे आवाहन-मुख्याधिकारी विनोद जाधव

-जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी यंत्रणा सज्ज 

कामठी :- कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यामध्ये दोन टप्प्यात ही जनगणना करण्यात येणार आहे यामध्ये 1 ते 15 मे या कालावधीत स्व-गणना करण्यात येणार आहे.

प्रथमच स्व-गनणेच्या माध्यमातून नागरिकांना जनगणनेच्या कार्यात सहभागी होता येणार आहे.स्वगणनेत मोबाईल च्या माध्यमातून स्वता माहिती भरावयाची आहे.दोन टप्प्यात होत असलेल्या जनगणनेत पहिल्या टप्प्यात घरयादी व गणना तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे 1 ते 15 मे या कालावधीत स्वगणना होणार आहे .जनगणनेच्या कामास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाळे व मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी जाहीर प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

भारत सरकारतर्फे 2027 जनगणनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात घरसूची व गृहगणना लवकरच सुरू होणार आहे.त्यापूर्वी 15 दिवसाची एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.1 मे ते 15 मे या कालावधीत डिजिटल पद्धतीने स्व गणना होणार आहे.या स्व-गणनेत नागरिकांनी http://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन माहिती भरावयाची आहे. त्यामध्ये नागरीकांना 33 प्रश्नांची माहिती भरणे आवश्यक आहे.कुटुंब प्रमुखाचे नाव ,10 अंकी मोबाईल क्रमांक नोंदविल्या नंतर ओटीपी येणार आहे.त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा स्थानिक तपशील निवडा, डिजिटल नकाशावर तुमच्या घराचे स्थान चिन्हांकित करा,घर आणि कुटुंबाची संबंधित माहिती भरा त्यानंतर आयडी तयार होणार आहे.हा 11 क्रमांकाचा आय डी नागरिकांनी सुरक्षितपणे जतन करायचा आहे.प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र आय डी प्राप्त होणार आहे.

16 मे ते 14 जून या कालावधीत दुसरा टप्पा राहणार आहे.प्रगणक घरभेटी साठी आल्यानंतर त्यांना हा आयडी दिल्यास प्रगणक तो पोर्टलवर अपलोड करतील .यावेंळी दिलेल्या माहितीची पडताळनी करण्यात येईल.

बॉक्स-यावर्षीची जनगनना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे.माहिती संकलनासाठी विशिष्ट अप्लिकेशन्स चा वापर करण्यात येणार आहे .प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी एप वापरले जाणार आहे.या अद्यावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती,पिण्याचे पाणी,वीज, स्वच्छता,मालमत्ता याबद्दलची सखोल माहिती घेण्यात येणार आहे.यातील माहिती जनगणना अधिनियम 1948 नुसार पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार असल्याचे तहसीलदार गणेश जगदाळे व मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.