spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपात पथनाट्य द्वारे सेवा हक्क बाबत जनजागृती

– ‘सेवा हक्क दिन’ निमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क दिनानिमित्त मंगळवारी (ता.२८) क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकसेवा हक्काविषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायद्यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेला त्वरित व पारदर्शक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची शपथ घेण्यात आली. मनपाच्या दहाही झोन कार्यालयात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या लोकसेवा हक्काविषयी माहिती देण्यात आली.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी उपस्थितांना शपथ देवोवली. यावेळी उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त श्याम कापसे, कार्यकारी अभियंता राजीव गौतम, कार्यकारी अभियंता अश्विनी येलचटवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे, जितेश धकाते, यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारदर्शक, वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमात ‘प्रगती कला मंच’च्या सहकार्याने जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. ‘प्रगती कला मंच’च्या कलावंतांनी प्रभावी गीत व पथनाट्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. यामध्ये गायक  विनोद इंगळे,  विद्याधर सरदार तसेच कोरस कलाकार  कांबळे, कोमल इंगोले, लाजश्री नंदागवळी यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. पथनाट्याचे आयोजन क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्या मार्गदर्शनात क्रीडा निरीक्षक  उज्वला चरडे यांनी केले.

विविध ठिकाणी कार्यक्रम

नागपूर महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क दिनाचे औचित्यसाधून पुढील दोन दिवस विविध ठिकाणी जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. यात फुटाळा तलाव, गांधीसागर तलाव, व्हेरायटी चौक, डॉ. आंबेडकर उद्यान येथे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.

Popular Articles