spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाघाये कॉलेजमध्ये ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने’वर सेमिनार संपन्न; विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार ९,००० रुपये विद्यावेतन!

लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे गुणवत्ता विभाग (IQAC) तर्फे ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६’ या विषयावर एक दिवसीय सेमिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या परिपत्रकानुसार या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश कापसे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “१८ ते २५ वयोगटातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या योजनेअंतर्गत देशातील ५०० नामांकित कंपन्यांमध्ये १२ महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी

मिळणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये विद्यार्थ्यांना दरमहा ९,००० रुपये स्टायपेंड आणि प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट सुद्धा मिळेल.”

– पात्रता: वय १८ ते २५ वर्षे. १० वी, १२ वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवीधर (BA, BSc, BCom, BBA इ.) विद्यार्थी पात्र आहेत. (उमेदवार पूर्णवेळ नोकरी किंवा  शिक्षणात नसावा). – फायदा: ५०० बड्या कंपन्यांमध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव.

– अर्ज कसा करावा: pminternship.mca.gov.in या पोर्टलवर किंवा मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करता येईल.

– कागदपत्रे: आधार कार्ड, शैक्षणिक सर्टिफिकेट्स, रहिवासी पुरावा आणि बँक खाते आवश्यक आहे.

IQAC विभाग प्रमुख डॉ. पुण्यशिल टेंभुर्णी यांनी या योजनेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, तरुणांना कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाचा अनुभव देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा खाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. श्रद्धा बोरकर यांनी मानले. यावेळी डॉ. योगेश करवाडे, डॉ. गीता टिचकुले, प्रा. वलथरे, डॉ. सुधीर सहारे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा, याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यास प्रत्यक्ष मदत केली.

Popular Articles