– राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे-उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार
– कामठी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
कामठी :- कोणतीही निवडणूक जिंकणे ही एक सुरुवात आहे खरा विजय तेव्हा होतो जेव्हा आपण तळागळातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे काम करतो .सत्तेत आल्यानंतर नुसते प्रशासन चालवण्या पुरते मर्यादित न राहता जनसामान्यांचे समस्यांच्या निराकरणाचे सेवेकरी बनावे .राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे .याच विचाराचे पाईक असलेले राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला, महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारनाचा चेहरा दिला .यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे कार्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी करत आहे.राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सर्व जाती धर्मातील नागरिकांना पुढे नेणारा पक्ष आहे.येणारा काळ हा विकासाचा आहे तेव्हा आपसातील मतभेद बाजूला सारून जनसेवेसाठी तत्पर राहा. कामठी शहर हे सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे.कामठी शहराला फुटबॉल ची नर्सरी असे संबोधन्यात येते या शहरातील प्रतिभावंत फुटबॉल खेळाडूनी कामठी शहराचे नाव आंतरराष्ट्रीय दर्जेत पोहोचवले.कामठी शहरातील खेळाडू हे प्रतिभावंत खेळाडू निर्माण होऊन ओलम्पियाड पर्यंत पोहोचो या सदीचचेसह कामठी शहरातील क्रीडा प्रेमींच्या योग्य त्या मागण्या क्रीडामंत्री म्हणून पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल .कामठी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासु देणार नाही मात्र त्या निधीचा सुनियोजित उपयोग हा पारदर्शकपणे व जनतेच्या हितासाठी व्हायला पाहिजे .कामठी शहराचा सर्वांगीण विकास करणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट आहे.राज्याचा विकास झाला पाहिजे हे अजित दादांचे स्वप्न होते.हे दादांचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.कामठी शहर हे फुटबॉल खेळातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू म्हणून देशात एक वेगळाच ठसा उंमटविणार .दादांना अल्पसंख्याक समुदायाविषयी खूप आपुलकी होती .अल्पसंख्याक समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्याचे दादांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा मधून विधानपरिषदेची उमेदवारी सिद्दीकी यांना दिली आहे.कामठी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने एकूण 27 उमेदवार निवडणूक रिंगनात उतरविले त्यातील 10 उमेदवार अतिशय कमी फरकाने पराभूत झाले तरी जनतेची कामे करत राहा असे मौलिक मत राज्याचे पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कामठीत आयोजित नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभात व्यक्त केले.
कामठी नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व नगरसेवकाच्या सत्कार समारोह राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कामठी येथील रब्बानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हस्ते दीप प्रज्वलन व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,माजी मंत्री सुबोध मोहिते ,राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे ,कामठी नगर परिषद चे अध्यक्ष अजय अग्रवाल ,उपाध्यक्ष सबा परवीन तैसीफ खान, माजी नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक शहाजाह शफाअत अंसारी ,नगरसेविका आभा पांडे ,डॉ नौशाद सिद्दिकी, राजू हिंदुस्तानी , अनिल अहिरकर , माजी नगरसेवक कपिल गायधने ,नगरसेविका दिव्या कपिल गायधने,नगरसेवक दिलीप बांडेबूचे, लालसिंग यादव उपस्थित होते कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हस्ते कामठी नगर परिषदेचे उपाध्यक्ष सबा परवीन खान , नवनिर्वाचित नगरसेवक, शहाजाह शफाअत असारी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष शहाजहा शफाअत अंसारी यांनी केले संचालन रमेश दुबे यांनी केले व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सबा परवीण खान यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते.

