spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान येथे बुद्ध जयंती धम्म रॅलीने उत्साहात साजरी

– तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र रथ आकर्षणाचे केंद्र.

कन्हान :- वैशाख बुद्ध पौर्णिमा आणि विश्वशांतीचे अग्रदूत महामानव तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे व्दारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व भव्य धम्म रॅली मिरवणुकीने कन्हान येथे बुद्ध जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

गुरूवार (दि.३०) एप्रिल ला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे मध्यरात्री १२ वाज ता चिमुकल्या मुलांच्या हस्ते भव्य केक कापुन फटा क्याची गगनभेदी आतिषबाजी आणि तथागत गौतम बुध्दांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो च्या जय घोष करण्यांत आला. शुक्रवार (दि.१) मे २०२६ वा सकाळी १० वाजता विश्वरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक कन्हान येथे भदंत आर्य के.सी. एस.लामा महाथेरो, रिपब्लिकन सांस्कृतिक संघ अध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, पोस्टे कन्हानचे पोलिस निरीक्षक वैजयंती मडवधरे, उपनिरीक्षक एकनाथ राठोड, बुद्धिष्ट वेल्फेअर सोसायटीचे कार्याध्यक्ष भगवान नितनवरे, सरचिटणीस विनायक वाघधरे, मनोज गोंडाणे, पुंडलिक मानवटकर, नितीन मेश्राम आदी मान्यवरांच्या हस्ते “महाकारुनिक तथागत गौतम बुद्ध व चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरां च्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्रिशरण ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बुद्धवासी गंगा भीमटे स्मरणार्थ भीमटे परिवार तर्फे खीरदान करण्यात आले. तसेच सायंकाळी ७ वाजता भव्यधम्म रैली पंचशील नगर महाविहार सत्रापुर कन्हान येथे माणिक  गजभिये, माजी सैनिक जयवंत गडपाडे, सिद्धार्थ नगरारे, माणिक चव्हाण यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बुद्ध वंदनेने रैलीची सुरूवात करण्यात आली. भव्य धम्म रैली मध्ये अखाडा, संदल, बँड पार्टी, लेझीम पथक, डी.जे, नाट्य पथक, महापुरुषाचे तैलचित्र रथ यात तथागत गौतम बुद्धाची प्रतिमा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आकर्षणाचे मुख्य केंद्र होते. ही रैली महामार्ग क्रमांक ४४ चे भ्रमण करित बि.के.सि.पी शाळा, गांधी चौक, नगरपरिषद कार्यालय, पोलिस स्टेशन भ्रमण करित डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अखाडयाचे कला कौशल्य सादर करित तथागत गौतम बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करित धम्म रैली पुढे तारसा चौक,नाका नंबर ७ येथील सुजाता बुद्ध विहारातील तथागतगौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्या र्पण करून भव्य धम्म रैलीची सांगता करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन सांस्कृतिक संघाने आगळा उपक्रम राबविला यात कन्हान, कांद्री येथिल अशोक नगर, शंकर नगर, संजीवनी नगर, वाघधरे वाडी, जवाहर नग र, पंचशील नगर सत्रापुर या विभिन्न प्रभागातील विश्व शांतीचे अग्रदूत तथागत बुद्धाची प्रतिमाचे आणि महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमासह रैली काढण्यात आली. ही रैली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे मोठया धम्म रॅलीमध्ये समाविष्ट झाले. या धम्म महोत्सवात मोठ्या संख्येत बोद्ध उपास क उपासिका व नागरिकांची उपस्थित होती. या भव्य धम्म रैलीचे विविध सामाजिक संघठना द्वारे शरबत, शीत पेय व भोजनदान वितरण करून रैलीचे स्वागत करण्यात आले. रिपब्लिकन सांस्कृतिक संघा तर्फे विविध प्रभागातील रैली काढणाऱ्या महिला व पुरुषांचे तसेच उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. बाबासा हेब आंबेडकर जयंती समारोह समिती कन्हान २०२५ , २०२६ यांचे सुजाता बुद्ध विहार प्रागणात मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रंसगी रिपब्लिकन सांस्कृतिक संघ अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, मनोज गोंडाणे, बुद्धिष्ट वेल्फेअर सोसायटीचे कार्याध्यक्ष भगवान नितनवरे, विनायक वाघधरे, दौलत ढोके, सामाजिक कार्यकर्ता प्रशांत वाघमारे, पुंडलिक मानवटकर, विक्रां त कोंडपनेनी, विनोद बावनगडे, रविंद्र महाकाळकर, महेंद्र चव्हान, राजेश फुलझेले, अश्वमेघ पाटील, नयन खोब्रागडे, मिलिंद वाघधरे, नितीन वाघमारे, राहुल सहा रे, दिनेश बागडे, आंनद चव्हान, संजय चहांदे, धीरज शेंडे, स्वप्निल नितनवरे, माजी सैनिक जयवंत गटपाडे, प्रियांशु वाघमारे, माणिक चव्हाण, मनिष भिवगडे, नितेश टेंभुर्णे, संदीप साहारे, राजेश मानवटकर, संयांश गेडाम, अखिलेश नगरारे, आदित्य टेंभुर्णे, सागर उके, राकेश लांजेवार, अनुप गजभिये, अमोल चव्हाण, निखिल बागडे, मनिष शंभरकर, वैभव बागडे, सुनील चव्हाण, अजय चव्हाण, आर्यन भिमटे, नितीन मेश्राम, निखिल रामटेकेे, शैलेश दिवे, अभिजीत चांदुरकर, विजय नगरारे, राजकुमार चहांदे, सुनील चव्हाण, नितेश टेंभुर्णॆ, संदिप साहारे, सुमेध नितनवरे, अमोल वंजारी, अखिलेष(बाळा)मेश्राम, शैलेश माटे, चिराल वैद्य, गौतम नितनवरे, दिनेश ढोके, दिनेश नारनवरे, महेश धोंगडे, रमेश चव्हाण, सतिश भसारकर, प्रणय वाघमारे , अमोल वंजारी, वंदना शेंडे, अश्विनी टेंभुर्णे, अर्चिता फुलझेले, कविता वाघमारे सह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका व नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अखिलेश मेश्राम तर आभार रोहित मानवटकर यांनी मानले.

Popular Articles