spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धर्मराज कनिष्ट महाविद्यालय कन्हान चा १०० % निकाल

– अनिका पाहुणे ८९.१७ % प्रथम, राज चंद्रोल ८४.१७% व्दितीय तर खुशी शहा ७२.८३% तृतिय क्रमांक

कन्हान :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर केला असुन यात धर्मराज कनिष्ट महाविद्यालय कांद्री- कन्हान चा १०० % निकाल लागला असुन  अविका पाहुणे हिने ८९.१८ % गुण प्राप्त करून कनिष्ट महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

धर्मराज कनिष्ट महाविद्यालय कांद्री-कन्हान येथे विज्ञान शाखेतुन एकुण ८० विद्यार्थ्यानी इयत्ता बारावीची परिक्षा दिली असुन ८० ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या कनिष्ट महाविद्यालयाचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ०२, ग्रेड १ – २८, ग्रेड २ – ५० असे एकुण ८० विद्यार्थी उत्तिर्ण झाले असुन कु. अविका संतोष पाहुणे हिने ८९.१७ % गुण प्राप्त करून धर्मराज कनिष्ट महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज मिथलेश चंद्रोल याला ८४.१७ % गुण प्राप्त करून व्दितीय तर कु. खुशी मनोज शहा हिला ७२.८३% गुण मिळवुन तिसरा क्रमांक पटकाविला आहे. धर्मराज कनिष्ट महाविद्यालय कांद्री-कन्हान ने इयत्ता १२ वी च्या परिक्षेत १०० % निकालाची प्रथा कायम केल्याने शाळेचे संचालक खुशाल पाहुणे यानी प्राचार्य, सर्व विषय शिक्षकांचे तसेच सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.