– एडुसन फाउंडेशन तर्फे “मिशन लेडी थ्राईव्ह” उपक्रमाची घोषणा
नागपूर :- एडुसन फाउंडेशन तर्फे महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी “मिशन लेडी थ्राईव्ह” या महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील ग्रामीण, अर्ध-शहरी आणि शहरी भागांमध्ये राबविण्यात येणार असून सुरुवातीच्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मिशन लेडी थ्राईव्ह अंतर्गत खालील प्रमुख उपक्रम राबविण्यात येतील: आरोग्य, मानवीय हक्क आणि सामाजिक विषयांवरील जनजागृती कार्यक्रम, उद्यमी जनजागृती अथवा तयार करणे व प्रोत्साहन देणे, महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे, सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम, डिजिटल व आर्थिक साक्षरता अभियान राबविणे, मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिराआयोजित करणे. या उपक्रमांद्वारे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढविणे, ज्ञानवृद्धी करणे आणि सुरक्षित तसेच सक्षम समाज निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाबद्दल एडुसन फाउंडेशनचे संस्थापक व संचालक निलेश काळे म्हणाले की, “मिशन लेडी थ्राईव्ह हा फक्त एक प्रकल्प नसून महिलांच्या आत्मविश्वास, कौशल्य आणि स्वावलंबनाचा पाया मजबूत करणारी चळवळ आहे. महिला सक्षम झाल्या तर समाज आपोआप प्रगत होतो.” एडुसन फाउंडेशन सर्व संबंधित घटक, भागीदार आणि समाजातील नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहे.