spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वडोदा पोलिसांची मोठी कारवाई ६१ लाखांच्या गांजासह ट्रक जप्त

कामठी :- नागपूर ग्रामीण पोलीस दलातील वडोदा पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. गस्तीदरम्यान उमरी फाटा येथे एका संशयास्पद उभ्या असलेल्या ट्रकची झडती घेतली असता, तब्बल १०५.१ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत गांजा आणि ट्रकसह एकूण ६१ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वडोदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ मे रोजी रात्री वडोदा पोलीस उमरी फाटा परिसरात गस्त घालत असताना, त्यांना रस्त्याच्या कडेला ट्रक क्रमांक MH 40 BL 4445 संशयास्पद स्थितीत उभा दिसला. पोलिसांना पाहताच ट्रकचालकाने अंधाराचा फायदा घेत उडी मारून पळ काढला. पोलिसांनी ट्रकच्या कॅबीनची आणि डाल्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यात खाकी टेपने पॅक केलेले पाकीट आणि हिरवट काळपट रंगाचा १०५.१ किलो गांजा आढळला.

वडोदा पोलिसांनी कारवाई करत १०५.१

गांजा (किंमत २१,०२,००० रुपये)

ट्रक: MH 40 BL 4445 (किंमत ४०,००,००० रुपये)

इतर: २ मोबाईल फोन (किंमत १०,००० रुपये)

एकूण ६१,१२,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला .

या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन वडोदा येथे एन डी पी एस कायद्याच्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(सी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.