spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिद्दीला कष्टाची जोड: झोपडपट्टीतील सुपुत्राची ‘लोकोपायलट’ पदी झेप !

– आई सफाई कामगार तर वडील घर बांधकाम मजूर; गरिबीवर मात करत पेलले स्वप्न*

नागपूर :- नशिबाचे रडगाणे न गाता, कष्टाच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते, हे एका झोपडपट्टीतील तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. आई शारदा धनराज कोटंगले नागपूर महानगर पालिकेत ऐवजदार सफाई कामगार आणि वडील धनराज कोटंगले बांधकाम मजूर असताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून या तरुणाने भारतीय रेल्वेमध्ये ‘लोकोपायलट’ (रेल्वे चालक) म्हणून नियुक्ती मिळवली आहे. त्याच्या या यशाने संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण असून, “कष्टाला पर्याय नाही” याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

संघर्षातून यशाचा मार्ग निघतो

नागपूर शहरातील एका अरुंद गल्लीत, छोट्याशा घरात राहणाऱ्या या तरुणाचा प्रवास थक्क करणारा आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य असतानाही शिक्षणाची ओढ मात्र कायम होती.

आईचे कष्ट: आई पहाटेपासून रस्त्यांची सफाई करण्याचे काम करते. आपल्या मुलाने मात्र साहेब व्हावे, हे तिचे स्वप्न होते.

वडिलांचा घाम: वडील दिवसभर बांधकाम साइटवर मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होते.

जिद्द: घरात अभ्यासासाठी पुरेशी जागा नसल्याने हा तरुण तथागत बौद्ध विहारातील सार्वजनिक वाचनालयात तासनतास अभ्यास करायचा.

यशाचे ‘वास्तविक दर्शन’

अनेकांना वाटते की मोठ्या पदावर जाण्यासाठी महागड्या क्लासची आणि पैशांची गरज असते. मात्र, या विद्यार्थ्याने स्वयंअध्ययन (Self-study) आणि जिद्दीच्या जोरावर रेल्वे भरतीची कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक चाचणीतही त्याने बाजी मारली. आज त्याची लोकोपायलट पदी निवड झाल्याने, रेल्वेच्या इंजिनचे सारथ्य आता एका कष्टकऱ्याचा मुलगा करणार आहे.

“माझ्या आईच्या हातातील झाडू आणि वडिल्याच्या हातातील फावडा थांबविणे हे माझ्याकरिता स्वप्न मनात ठेवून डॉक्टर बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान होते. त्यांच्या कष्टाचे चीज झाले, याचा मला सर्वाधिक आनंद आहे.”अशी प्रतिक्रिया

— नवनियुक्त लोकोपायलट सुजल शारदा धनराज कोटंगले ह्यांनी व्यक्त केल्या, ह्या यशामुळे परिसरात कौतुकाचा वर्षाव होत असून या यशाची बातमी समजताच झोपडपट्टी परिसरात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. “परिस्थिती आडवी येत नाही, जर तुमची जिद्द मोठी असेल,” अशा भावना शेजाऱ्यांनी व्यक्त केल्या. एका सफाई कामगाराचा मुलगा आता रेल्वे चालवणार, ही बाब परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरत आहे. ह्या प्रसंगी आदर्श माध्यमिक शाळेतील शिक्षक प्रतीक मेश्राम, मेंढे, ह्याचे सह नागपूर महानगर पालिका झोनल अधिकारी भोला खोब्रागडे , महानगर महामंत्री (अनुसूचित जाती मोर्चा )इंद्रजित वासनिक, नागपूर जिल्हा महानगर कामगार संघ सचिव मंगेश गोस्वामी स्वास्थ निरीक्षक गौतम मेश्राम ह्यांनी पुषगुच्छ आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.