spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जगाला बुद्धांच्या मानवतावादी विचाराची गरज – सुरेश भोयर

कामठी :- वैशाख महिन्यातील पौर्णिमा हा दिवस भारतीय तसेच जागतिक सांस्कृतिक परंपरेत अत्यंत पवित्र चिंतनशील आणि मुल्य प्रधान मानला जातो याच दिवशी मानव जातीला करुणा,अहिंसा , समता आणि प्रज्ञेचा सार्वत्रिक संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म,ज्ञानप्राप्ती आणि महापरीनिर्वाण हे तिन्ही महत्वपूर्ण प्रसंग घडले आहे.त्यामुळे हा दिवस मानवी मूल्यांचे पुनरुज्जीवन करणारा,स्वपरिक्षणाची प्रेरणा देणारा आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण पर्व आहे. असे मत माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी येरखेडा येथील वज्रहावीरांनूवत्र बुद्ध विहारात बुद्ध धम्म संदेश समिती येरखेडा च्या वतीने आयोजित बुद्ध जयंतीनिमित्त महारापरित्रांन पाठ व कँडल मार्च कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा येरखेडा येथील वज्रहाविरानुवत्र बुद्ध विहारात बुद्ध जयंती निमित्त बुद्ध धम्म संदेश समिती येरखेडा च्या वतीने महापरित्रांन पाठ व केंडल मार्च चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात भन्ते डॉ बुद्धरत्न संबोधि यांनी विशेष बुद्ध वंदना घेत महापरित्राण पाठ घेतल्या नंतर भव्य कँडल मार्च काढण्यात आले.या कँडल मार्च चा शुभारंभ वज्र हाविरानुवत्र बुद्ध विहारातून निघत येरखेडा गावाच्या मुख्य मार्गाने भ्रमण करीत बुद्ध विहारात समापन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून –वरिष्ठ पुलिस निरीक्षक-

महेश आंधळे,, जुनी कामठी चे पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, येरखेडा नगर पंचायत अध्यक्ष राज किरण बर्वे, रणाळा ग्रा प सरपंच पंकज साबळे, अनिल पाटील, गौतम पाटील,सुमेध दुपारे,गौतम तपासे,रंजना काळे, इम्रान नवीन मसूद अहमद अंसारी, मनीष कारेमोरे, राईसा अंजुमियाकूब, नरेश मोहबे, गजानन तिरपुडे, कल्याणी रामटेके, गुलसफा परवीन, योगिता काळे, मंदाताई महल्ले, आशिष वंजारी, ममता पिपरीवार, सय्यद रसिदा बेगम, सुशांत सलाम, राजेश बनसिंगे, योगिनी त्रिशरण खोब्रागडे,, सितम मथुरे, मनोज बडवाईक,तरुण घडले, कमलेश बागडे, विनोद बावनगडे, कुलदीप पाटील, योगेश भगत, चंद्रपाल सहारे, सुमेध रंगारी, डॉक्टर पृथ्वीराज देशमुख,, निकिता पाटील, प्रिया दुपारे, ज्योती घडले, अनिता मोडघरे, और उपस्थित बौद्ध उपासक, बौद्ध उपसिका उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.