– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता.6)शोध पथकाने 62 प्रकरणांची नोंद करून 32,400 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 32 प्रकरणांची नोंद करून 12,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून रू.600 रूपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणीकचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमा हॉल,मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 8,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता,मंडप,कमान,स्टेज इत्यादी रचना करून अथवा वैयक्तिक कामाकरिता रस्ता बंद करणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 3,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 2,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. देवयान-07 यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. चंद्रगंगा अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. बालाजी शुध्द शाकाहारी भेजनालय यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे च शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. हॉटेल ताज बिरयानी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. अनजानी अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. एसआयपी अबॅकस क्लासेस व मे. अभियान अकॅडमी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे प्रत्येकी रू.5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. जयंत स्वीटस् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.जैन किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. एव्हरेस्ट मोमोज् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. गरबा बिरयानी सेंटर यांनी रस्त्यालगत रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे च शुल्क न भरल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू.65,000 दंड वसुल केला.