spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन

नागपूर, ता.२६: आरक्षणाचे जनक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते थोर समाजसुधारक, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मनपाच्या उपायुक्त  विजया बनकर,साप्रविचे अधीक्षक राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता  कमलेश चव्हाण, जनसंपर्क विभागाचे  अमोल तपासे, नरेंद्र रामटेके  शैलेश जांभूळकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles