spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उन्हाच्या झळांत नागरिकांना दिलासा; किशोर बेलसरे यांच्या वाढदिवसी सार्वजनिक प्याऊ सरू

– कन्हान मध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन

कन्हान :- वाढत्या उन्हामुळे नागरिकांना भेडसावणा ऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येची दखल घेत कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर बेलसरे यांच्या वाढदिवसा निमित्य सार्वजनिक पाणी प्याऊ सुरू करण्यात आले. आंबेडकर चौक येथे झालेल्या या उपक्रमा मुळे प्रवासी, कामगार, विद्यार्थी तसेच नागरिकांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

कन्हान शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असुन दुपारच्या वेळेत नागरिकांना पिण्याच्या पाण्या साठी भटकंती करावी लागत आहे. ही गरज ओळखुन गुरुवार (दि.७) मे ला सायंकाळी ५ वाजता आंबेडकर चौक कन्हान येथे सार्वजनिक पाणी प्याऊचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी सुनील लाडेकर, अशोक हिंग णकर, गणेश पानतावणे, नरेंद्र वाघमारे, पुरंदास तांडेकर, श्रीराम नांदुरकर, नथु चरडे, रमेश खंडेलवाल, राजु इंगोले, संतोष पाली, रमेश जामदार, चेतमणी मिश्रा, गुडा सूर्यवंशी, अमोल साकोरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातुन नागरिकांना मदत करण्याची भावना जपली पाहिजे असे मत व्यक्त केले. उन्हाळ्यात नागरिकांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या नंतर कन्हान युथ फाऊंडेशनच्या व्दारे विवेकानंद नगर येथील निवासस्थानी वाढदिवसा निमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहुन किशोर बेलसरे यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॅप्टन सतीश बेलसरे, देविदास तडस, सूर्यभान फरकाडे, नितेश भरणे, गणेश रामापुरे, शैलेश झेंडे, आकाश भगत, दिगंबर हारगुळे, अमित बेलसरे आदीसह फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.