किशोर साहू, मौदा :- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त, नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या संकल्पनेतून ग्रा पं चाचेर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात आले. या शिबिरात परिसरातील गरजू नागरिकांनी लाभ घेतला.
![]()
याप्रसंगी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर ,नायब तहसीलदार योगिता दराडे, निमखेडा – चाचेर जि प सर्कल मधील शिवसेनेचे जि प चे भावी उमेदवार कृष्णा टिकले, ग्रा पं चाचेर उपसरपंच रवींद्र ठाकरे, सचिव वरुडकर, ग्रा पं खंडाळा, नरसाळा सचिव श्रद्धा सपाटे, सदस्यगण शैलेश कोपरकर, सुरेंद्र टेंभरे , माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण बरबटे, मंडळ अधिकारी काळे , पटवारी अविनाश माटे, सर्व हलक्याचे पटवारी, संबंधित ग्रामपंचायतचे सचिव, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी ,पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आधार केंद्र, महावितरण, पंचायत विभाग, कृषी विभाग ,पाटबंधारे विभाग इतर सर्वे विभागातील अधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.