खापा, वार्ताहर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभाग नागपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्ग दहावीच्या परीक्षेचा नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात स्थानिक जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम ठेवत वर्ग दहावीचा निकाल ८६.९५ टक्के निकाल दिला. वर्ग दहावीला ४६ विद्यार्थी प्रविष्ट होऊन ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये प्रवीण श्रेणी ५ तर प्रथम श्रेणीत ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वर्ग दहावीतून उत्कर्ष सचिन लांजेवार तिने ८५.४० टक्के गुण प्राप्त करून प्रथम, प्रिया गणेश येनुरकर ७७.६० टक्के गुणांसह द्वितीय तर साक्षी धनराज राक्षे यांनी ७७.४० टक्के गुण प्राप्त करून तृतीय स्थान पटकावला.
कठोर सातत्यपूर्ण परिश्रम व योग्य मार्गदर्शनामुळे यश प्राप्त होते. अशा भावना यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष रणजीत देशमुख, संस्थापक डॉ. भाऊसाहेब भोगे, उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. आशिषराव देशमुख, सचिव युवराज चालखोर, पालक संचालक ॲड. चंद्रशेखर बरेठिया, प्राचार्य सुधाकर गजभिये तसेच सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना दिले. यावेळी विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.