-विविध लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वाटप
कामठी :- नागरिकांचे विविध कार्य एकाच ठिकाणी पूर्ण करता यावे व तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्राप्त करून घेण्याकरीता कामठी तहसील कार्यालय तर्फे बिडगाव नगर पंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरामध्ये नगरपंचायत बिडगाव क्षेत्रातील तसेच तरोडी मंडळ भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महसूल विभाग, नगरपंचायत विभाग, तालुका कृषी अधिकारी विभाग ,पंचायत समिती विभाग आरोग्य विभाग या विभागाच्या विविध सेवांचा शिबिरामध्ये सहभागी होऊन नागरिकांनी लाभ घेतला. सदर शिबिरामध्ये माजी जी प सदस्य अनिल निधान भाजप पदाधिकारी रमेश चिकटे,एसडिओ संजय पवार , नायब तहसीलदार मयूर चौधरी,बिडगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी विनायक घुगे ,बिडगाव,नगराध्यक्ष वीरू जामगडे, तसेच नगरपंचायत चे सभापती,नगरसेवक विविध पदाधिकारी आदी उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये महसूल विभागातर्फे विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.यात प्रामुख्याने नवं मतदार नोंदणी, दुरुस्ती,नवीन रेशन कार्ड,आधार नोंदणी व दुरुस्ती,प्राथमिक आरोग्य तपासणी,जन्म दाखले मृत्यू दाखले सोबतच रहिवासी दाखले ,ई मोजणी अर्ज, मालमत्ता पत्रक वाटप, पी एम किसान,महावीतरण एप यासारख्या विविध योजनांचे लाभार्थ्यांना पत्र वाटप करण्यात आले. त्यानुसार 17 सात बारा दुरुस्ती प्रकरणे,25 डिजिटल सात बारा प्रकरणे,27आठ अ उतारे प्रकरणे मंजूर करीत तसेच 123 प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
मंचावर उपस्थित एसडीओ संजय पवार यांनी अशा शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत आव्हान केले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिरामध्ये उपस्थित नागरिकांना विविध दाखल्यांचे तसेच प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.