spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुलेट जनरल पॉल बर्फी यांनी विकासाच्या संधीची घेतली माहिती

– विभागीय आयुक्त बिदरी यांच्यासोबत बैठक

 नागपूर :- ऑस्ट्रेलियाची कॉन्सुलेट जनरल फॉल मर्फी यांनी विकासाच्या विविध संधी बाबत माहिती घेतली. उद्योग, शिक्षण, क्रीडा आरोग्य, खनीकर्म आदी क्षेत्रात असलेल्या संधीसंदर्भात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांचे सोबत विविध उपक्रमासंदर्भात माहिती घेतली.

ऑस्ट्रेलिया आणि नागपूर येथे उपलब्ध असलेल्या संधी संदर्भात त्यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुलेट जनरल फॉल बर्फी यांचे स्वागत केले.

भारताच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर या शहराचा वेगाने विकास होत असून कृषी विकासासोबतच नागपूर हे एज्युकेशन हब म्हणून विकसित होत आहे. उच्च शिक्षणाच्या सर्व संस्था येथे उपलब्ध असल्यामुळे तज्ञ मनुष्यबळ येथे असून ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठाने येथील शैक्षणिक संस्थांसोबत उपलब्ध असलेल्या संधी संदर्भातही चर्चा केली. माहिती तंत्रज्ञान मायनिंग तसेच विविध उद्योगांसाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम सुरू करणे सुलभ होणार आहे यामध्ये प्रामुख्याने स्पोर्ट सायन्स सारखे अभ्यासक्रम सुरू करण्यास मोठी वाव असल्याचे यावेळी कॉन्सुलेट जनरल पॉल मर्फी यांनी सांगितले.

कॉन्सिलेट जनरल पॉल मर्फी यांनी यापूर्वी नागपूरला भेट दिली असून येथील कापूस उत्पादन व त्याची निर्यात कृषी तंत्रज्ञान आदीबाबत माहिती घेतल्याचे सांगितले. गडचिरोली येथील डॉ. अभय बंग यांच्या सर्च या संस्थेला भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

नागपूर विभागात क्रिटिकल मिनरल्स तसेच कॉपर मायनिंग आणि ग्रीन स्टील इंडस्ट्रीज आधी बाबतही त्यांनी आवर्जून माहिती घेतली ऑस्ट्रेलिया येथे मायनिंग क्षेत्रातील विविध उपक्रमाबाबत प्रतिनिधी सोबत चर्चा केली.

आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करून या विद्यापीठातील अभ्यासक्रम राज्यात सुरू व्हावे यासाठी चर्चा केली असल्याचे सांगताना पाल म्हणाले की नागपूर येथे उच्च शिक्षण उद्योग मायनिंग आदेश क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत यासंदर्भात ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्रासोबत सहकार्य करण्याची यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विनायक महामुनी, खनिकर्म विभागाचे महासंचालक डॉ. टी आर के राव, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे शशिकांत शेषराव, पी बी वानखडे उद्योग विभागाचे सह संचालक शिवकुमार मुद्दमवार, सह आयुक्त तुषार मठकर, सह आयुक्त अविनाश हदगल आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.