spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आशीनगर झोन मधे पावसाळी पूर्व दौरा

नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आशी नगर झोनचे सभापती आसिफ शेख यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांची पाहणी करण्यासाठी विशेष दौरा आयोजित करण्यात आला.

या दौऱ्यामध्ये उत्तर नागपूरातील नगरसेवक अभिषेक शंभरकर, दिनेश यादव, गौतम अंबादे, संगीता सुरेश पाटील, सुरेश पाटील, सतीश पाली यांची उपस्थिती होती.

तसेच झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता निलेश बोबडे, सहाय्यक अभियंता प्रदीप सरपाटे, स्वास्थ अधिकारी भोला खोब्रागडे, स्वास्थ निरीक्षक रोशन जांभुळकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या दौऱ्यात पीली नदी, नोगा फॅक्टरी नाला, चभार नाला, कामगार नगर नाला, गुलशन नगर, वाजरा परिसरातील नाला विविध नदी व नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी सर्व नाले व नद्यांची तातडीने स्वच्छता व सफाईची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.