spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर चरडे यांच्यावर नगरसेवकांसमोरच दगड उचलून मारण्याचा प्रयत्न !

– मंजोश जांभुळकर यांची चौकशी करून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची पत्रपरिषदेत मागणी

अतिक्रमण व सिव्हिल कोर्टात केस चालूच आहे. या संदर्भात नंदकिशोर चरडे यांना मंजोश जांभूळकर यांनी अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. आणि मोठा दगड उचलून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. जांभुळकर पासून चरडेच्या जीवाला धोका असल्यामुळे परिषदेमध्ये धाव घेतली. आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर चरडे यांनी पत्रकारांना माहिती दिली.अशा क्राईम वृतीच्या लोकांना धडा शिकवायला पाहिजे आणि जो कोणी व्यक्ती पत्रकारांवर आरोप किंवा अत्याचार करतो, त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली. अतिक्रमण संदर्भात केस न्यायालयात असून यावर काहीच कारवाई झालेली नाही त्याच रोडवर काही लोकांनी बांधकाम करण्याचा प्रयत्न केला तिथे मोजमाप करण्यासाठी गड्डा खोदला व काम करण्यासाठी काही लोक आले असता तिथे नगरसेवक बाबा बोबडे आले आणि त्यांच्या समोरच हा वाद निर्माण झाला. जेणेकरून या अतिक्रमा संदर्भात सिव्हील कोर्टात केस चालू असतांनी तारखा वर तारखा लढत आहे. म्हणूनच चरडे यांनी पुढाकार घेत असताना समोरच्या व्यक्तीने त्याला कोणता आदेश ? कोर्टाच्या आदेशाला आम्ही आमच्या खिशात ठेवतो ? या प्रकरणात तुम्ही जर पडले तर तुमचा जीव घेऊ आणि मोठा दगड उचलून मला मारण्यास धावला तेव्हा ते काही लोकांनी त्याला पकडलं आज तुला मी मारूनच टाकतो अशी धमकी सुद्धा मंजोश जांभुळकर यांनी ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर चरडे यांना दिली. मंजोश जांभुळकर यांनी इन्कमटॅक्स डॉक्युमेंटची चोरी केल्याच्या आरोपात क्राईम पोलिस अटक करण्यार होती परंतु तो फरार झाला. जांभूळकरची कसून चौकशी करण्यात यावी. मंजोश जांभुळकर यांची कसून चौकशी करून घ्यावी. कारण हा क्रिमिनल वृत्तीचा माणूस आहे. याच्यावर काही केसेस आहे. हा असाच सगळ्यांना दबावाखाली ठेवतो. दिनांक 11 मे 2026 रोजी, सक्कदरा पोलीस स्टेशनमध्ये चरडे यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोरे साहेबांना निवेदन देण्यात आले व जांभूळकर वरिल कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रपरिषदेत नंदकिशोरजी चरडे यांनी केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.