spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भारतीय थल सेना जवानाचा सेवानिवृत्तीपर सत्कार

सचिन चौरसिया,रामटेक :- तालुक्यातील चिचाळा येथील रहिवाशी असलेले सतजीवन हनुमानप्रसाद दमाहे हे १३ नोव्हेंबर २००६ मध्ये भारतीय थलसेनेत भरती झाले होते. नियत वयोगानानुकसार ते नुकतेच सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा गावात गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांचे जॉयनिंग लॅन्सडाफन उत्तराखंड येथे होते तर सेवानिवृत्त ३ सिआचीन ग्लेसीअरमधून झाली. त्यांनी एकूण २० वर्ष सेवा दिली. सेवानिवृत्तीनंर ते गावात आले असता त्यांची रॅली काढून स्वागत करण्यात आले. त्यानंतर सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्ती तथा मृर्ती प्राणप्रतिष्ठेच्या औचित्यावर दमाहे यांचेकडून सामूदायीक भोजनाचा कार्यक्रम देण्यात आल्याची माहिती चिचाळा येथील सामाजिक कार्यकर्ते मिताराम दमाहे यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.