spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रामगढ येथे देशी लोखंडी पिस्तूलासह तरुणास अटक

– 56 हजाराचा मुद्देमाल जप्त

– एक दिवसाची पोलीस कोठडी

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदनगर रामगढ येथे देशी लोखंडी पिस्तूल व दोन जिवंत कारतुससह तरुणास अटक करून 56 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त केल्याची कारवाई बुधवारला रात्री एक वाजता सुमारास नवीन कामठी पोलिसांनी केली .

नवीन कामठी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आनंदनगर रामगढ येथे राजू गजभियेच्या घरी भाड्याने राहात असलेला आरोपी इरफान हुसेन शेख वय 30 वर्ष याच्याकडे लोखंडी देशी पिस्टल व जिवंत कारतुस असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी बुधवार ला रात्री एक वाजता सुमारास आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरात देशी लोखंडी पिस्तोल व दोन जिवंत कारतूस मिळून आल्याने आरोपी इरफान हुसेन शेख यास अटक करून त्याचे जवळून देसी लोखंडी पिस्तोल व दोन जीवन कारतुस जप्त केले .असा एकूण 56 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केले. पोलीस दिसताच त्याच्या सहकारी अतीक शेख लतीफ शेख राहणार शांतीनगर नागपूर हा पडून जाण्यात यशस्वी झाला दोन्हीही आरोपी विरोधात नवीन कामठी पोलीस स्टेशनला आर्म याक्ट 3/25 भारतीय हत्यार अधिनियम दोन एकूण 2019 चे कलम 5 (1) अ ,सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आरोपी इरफान हुसेन शेख वय 30 वर्ष यास कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्यामुळे त्यांनी देशी लोखंडी पिस्तोल कुठून आणले व त्याच्या उपयोग कशासाठी करणार होता किंवा कोणाला विकणार होता याचा योग्य तपास करून फरार आरोपी अतीक शेख लतीफ शेख याला त्वरित अटक करण्यात येणार असल्याचे नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले आहे वरील कारवाई पोलीस उपायुक्त डॉ निखिल पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे,एपिआय सचिन यादव,  भानुदास गीते ,पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे, किशोर महंत, श्याम गोरले ,नसीम अन्सारी, मिथुन शेंद्रे यांच्या पथकाने केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.