कामठी :- ग्रामपंचायत केम उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, नागपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कामठी अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पचा माध्यमातून हवामान बदलास अनुकूल शेती तंत्रज्ञान, दर्शपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत, नीमबोळी अर्क तयार करण्याची प्रात्यक्षिक, शाश्वत शेती व उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले, घरच्या घरी नैसर्गिक रित्या किड नियंत्रण कसे करता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच देशी गोमाता पासून मिळणारे गोमूत्र, शेण,दुध,पासून कमी खर्चा मध्ये नैसर्गिक शेती कशी करता येईल याबद्दल माहिती देण्यात आली व आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जिवाणू यांची वाढ करून आपल्या जमिनीचा कर्ब कसा वाढवता येईल याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी सरपंच अतुल बाळबुधे, कृषी सेवक एच जी राखोंडे, तंत्रज्ञान समन्वयक नितेश वानखडे समूह सहायक ऋतुजा तवले व गावातील शेतकरी निशिकांत फुलझेले, विष्णू नरड, त्र्यंबक मांगे, एकनाथ साबळे, प्रशांत चौधरी,विष्णू देऊळकर,मोहन कुथे, नारद ब्राम्हणकर, व इतर शेतकरी महिला कृषि सोनू आखरे उपस्थित होते.
केम येथील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.