नागपूर :- संपूर्ण जगात शांतता प्रस्तावित व्हावी व अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचावा, देशासाठी दहशतवाद विरोधात लढणाऱ्या सैनिकाच्या बलिदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा करण्यात आला.
आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात अपर आयुक्त सामान्य प्रशासन प्रदीप कुलकर्णी यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली.