spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिला सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलणार

महापौर निता ठाकरे यांचे सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाला आश्वासन

नागपूर :- शहरातील महिला सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हजेरी स्टँडवर नागरी सुविधा उभारून त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी पावले उचलले जाईल, असे आश्वासन महापौर निता ठाकरे यांनी सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले.

महिला सफाई कामगारांच्या सुरक्षितता तसेच कामाच्या ठिकाणी असलेल्या नागरी सुविधांच्या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने महापौर निता ठाकरे यांची महापौर कक्षात (ता. 21) भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे उपस्थित होत्या. यांच्यासह युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे आणि युवती प्रमुख प्रशंसा भोयर, महामंत्री रितेश पांडे,रिषभ अरखेल, विद्यार्थी आघाडी प्रमुख शंतनू झाडे,योगिता बुरडे,प्रतिक्षा घारडे,कल्याणी कुबडे रश्मि श्रीवास, श्रद्धा धवळे,मोना पराते,आशीष तिवारी व आर्यन टाकभौरे व इतर भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोमीनपुरा भागातील हजेरी स्टँडच्या परिसरात दोन महिला सफाई कामगारांनी विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजयुमोच्या नेतृत्वात सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेतली. महिला सफाई कामगारांनी कामाच्या ठिकाणी काही असामाजिक तत्वाकडून होत असलेल्या विनयभंगाबद्दल तसेच कामाच्या ठिकाणी उपलब्ध नसलेल्या नागरी सुविधांची व अडचणींची माहिती दिली.

महिला सफाई कामगारांच्या कैफीयत ऐकल्यानंतर महापौर निता ठाकरे यांनी या संदर्भात तात्काळ दखल घेतली व महिला सफाई कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल सक्षम उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून महिला सफाई कामगारांच्या सुरक्षितेला प्राधान्य दिले जाईल. तसेच या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. शहरातील सर्व हजेरी स्टँडवर सफाई कामगारांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध देण्याच्या संदर्भात पावले उचलले जाईल. शहरातील अरुंद रस्ते व गल्ल्यांच्या साफसफाई करण्यासाठी महिलाऐवजी पुरुष सफाई कामगारांची नियुक्ती करता येईल काय, यावर सुद्धा अधिकार्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही आश्वासन निता ठाकरे यांनी यावेळी दिले.

Popular Articles