आज नागपूर महानगरपालिकेतील सर्वात तरुण सभापती व नगरसेविका निधी मिनाक्षी नितीन तेलगोटे यांनी आपल्या पहिल्या मानधनाची संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस समर्पित करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
“समाजाचे आपण काही देणे लागतो” या उदात्त भावनेतून त्यांनी उचललेले हे पाऊल निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आदरणीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या कार्याचे कौतुकही केले आहे..