spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

Ø दावे व हरकतींसाठी २९ मेपर्यंत मुदत

Ø ४ जूनला अंतिम मतदार यादी

यवतमाळ :- यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदार संघाच्या विधानपरिषद निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केला असून, त्यानुसार दि. १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाने यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदार संघाची निवडणूक घोषित केल्यानंतर प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी सर्व नगर परिषद व नगर पंचायत सदस्यांची यादी संबंधित कार्यालयांकडून प्राप्त करून घेण्यात आली आहे.

त्यानुसार प्रारूप मतदार याद्या ह्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, नगर पंचायत कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालय येथे दि. २३ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या मतदार याद्यांवर दि. २९ मे २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींवर दि. ३१ मे २०२६ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी दि. ४ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश शिंगटे यांनी दिली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.