spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बहुविकलांग प्रवर्गातील दिव्यांगांना मिळणार दरमहा ५०० रुपये निर्वाह भत्ता

९७६ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळाला योजनेचा लाभ

मतीमंद घटकातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता योजना   

नागपूर, ता. २६  :  नागपूर महानगरपालिकेद्वारे दिव्यागांचे सर्वागीण विकासासाठी व त्यांना स्वाभिमानाने जीवन जगता यावा, याकरिता समाज विकास विभागांतर्गत दिव्यांगांचे विविध योजना राबविण्यात येत आहेत. मतिमंद, सेरेबल पालसी, ऑटिझम, विशेष विकलांग, बहुविकलांग प्रवर्गातील दिव्यांगांना निर्वाह भत्ता प्रति लाभार्थी दरमहा ५०० रुपये देण्याची अर्थसहाय्य योजनेंतर्गत मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या मान्यतेनुसार, या आर्थिक वर्षात एकूण ९७६ दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या देखरेखीत या योजना राबविण्यात येत आहेत.

रमाई घरकुल आवास योजनेत मनपाचेही योगदान

प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र.३ (परवडणारी घरकुले),घटक क्र,४ (BLC), रमाई घरकुल आवास योजना अंतर्गत निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना शासन अनुदान रु.२.५ लक्ष व्यतिरिक्त  रुपये ५०,००० महानगरपालिकेकडून अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्याकरिता या आर्थिक वर्षात अर्ज केलेल्या ०३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मा. आयुक्त तथा प्रशासक यांनी दिलेल्या मान्यतेनुसार योजनेचा लाभ देण्यात आला.  या योजनांचा लाभ घेण्याकरिता मनपाच्या संकेत स्थळावर www.nmcnagpur.gov.in ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या दिव्यांग लाभार्थी या योजनेंतर्गत अर्ज करू शकतात. उपरोक्त योजनांचा लाभ या प्रवर्गातील जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवहान मनपाद्वारे  करण्यात आले आहे.

Popular Articles