spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रवाशी पती, पत्नीला जख्मी करून एक लाखाचे सोन्याचे दागिने हिसकावुन आरोपी पसार

– नागपुर बॉयपास बोरडा टोल नाक्या जवळ पहाटे सकाळी ३ वाजता कार मध्ये घटना

कन्हान :- आग-यावरून विजयवाडा येथे घरी परत जाणा-या पती, पत्नी व ६ वर्षाची छोटी मुली सह प्रवाश करित थकुन रात्री नागपुर बॉयपास वरील बोरडा टोल नाक्या जवळ कार मध्ये आराम करित असताना अज्ञात आरोपीनी पहाटे सकाळी ३ वाजता कारच्या दरवाजाचे काच दगडाने फोडुन आणि पतीला दगड व चाकुने मारून गंभीर जख्मी करित पत्नी ला सुध्दा दगडाने मारून जख्मी करून दोघाच्याही गळयातील एक लाखाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिकावुन आरोपी पसार झाल्याने कन्हान पोस्टे ला अज्ञात तिन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित अज्ञात तिन आरोपीचा शोध घेत आहे.

बुधवार (दि.१३) मे २०२६ ला श्रीनाथ व्यंकटे श्वरराव दोडापाटी वय- ३३ वर्ष, रा. ७-१३ पंचायत ऑफिस जवळ गोलापुडी, विजयवाडा, आंद्रप्रदेश हे त्यांची पत्नी व छोटी ६ वर्षाची मुलगी तिघेही स्वत:च्या बेलेनो कार क्र एपी १६ एफ एल २९४२ ने मनाली, आगया ला फिरायला निघाले होते. मनाली मध्ये चार दिवस आणि आगरा मध्ये चार दिवस थांबले. तेथुन घरी परत जाण्यासाठी रविवार (दि.२४) मे २०२६ ला सकाळी महामार्गाने निघुन प्रवाशात थकल्याने आणि रात्र झाल्याने बोरडा टोल नाक्याजवळ कारचे दरवाजे आत मधुन लॉक करून कार मध्ये आराम करित झोप ले असता सोमवार (दि २५) मे च्या पहाटे सकाळी ३ वाजता दरम्यान अज्ञात व्यक्तीने येऊन डॉयव्हर कडील दरवाज्याला दगडाने मारून काच फोडल्याने श्रीनाथ दोडापाटी यांची झोप उघडल्याने फुटलेल्या खिडकी तुन बाहेर पाहिले असता अज्ञात दोन ते तिन पुरूष इसम चेह-यावर मॉस लावुन दिसले. त्यातील एकाने खिडकीतुन हाताने दगड श्रीनाथच्या चेह-याच्या डाव्या बाजुला मारल्याने रक्त निघु लागले, दुस-याने दरवाजा उघडुन श्रीनाथच्या डाव्या बाजुला चाकुने मारून गळ यातील सोन्याची १० ग्रँम ची चैन हिसकुन काढली. तेव्हाच पत्नी आली असता तिला सुध्दा दगड मारून तिच्या गळयातील सोन्याचे ६ ग्रँम चे मंगळसुत्र हिसका वुन आरोपी तेथुन पळुन गेले. श्रीनाथ गंभीर जख्मी असल्याने पत्नीने १०३३ वर फोन लावला परंतु रिसपॉ न्स न मिळाल्याने १०० नंबर वर फोन लावुन पत्नीने स्वत: कार चालवुन नागपुर बॉयपास रोडने नेऊन मॅक्स मल्टीस्पेशिलिटी हॉस्पिटल नागपुर येथे उपाचा रार्थ दाखल झाले.

कन्हान पोलीसाना घटनेची माहिती मिळल्या वर पीएसआय एकनाथ राठोड हयानी मॅक्स मल्टीस्पे शिलिटी हॉस्पिटल नागपुर येथे जावुन फिर्यादी श्रीनाथ व्यंकटेश्वरराव दोडापाटी ला आरोपीने दगडाने व चाकु ने मारून त्याच्या गळयातील १० ग्रँम सोन्याची चैन कि. ७००००/- रु. आणि पत्नी ला सुध्दा दगडाने मारू न जख्मी करित तिचे ६ ग्रँमचे सोन्याचे मंगळसुत्र किं. ३०,०००/- रु. असा एकुण १,००,०००/-रू. मुद्देमाल बळजबरीने हिसकावुन आरोपी पळाल्याने कन्हान पोस्टे ला थानेदार वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात अप.क्र. कलम-३७१/२६ कलम ३०९ (४), ३०९(६), ३२४(४), ३(५) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित अज्ञात आरोपींंचा शोध घेत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.