spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बकरी ईदच्या पाश्वरभूमीवर पोलिसांचा रूट मार्च ड्रोन पाहणी

कामठी :- आगामी शांतता व सळोख्याचा सण ‘बकरी ईद’च्या पाश्वरभूमीवर नवीन कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने येथे पोलिसांच्या वतीने एका भव्य रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते. तसेच रुईगंज मैदानातून ड्रोन उडवून परिसराची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी एसीपी अंकुश खेडकर, पोलीस निरीक्षक महेश आंधळे,पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, एपीआय सचिन यादव आदी उपस्थित होते. दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने कामठी शहरातील नागरिकांना आगामी सण अत्यंत शांततेत बंधूभाव राखून आणि कायद्याचे काटेकोर पालन करून सणोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचेही यादरम्यान सांगण्यात आले.सध्या उन्हाचा पारा वाढलेला असतानाही पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपले कर्तव्य चोख बजावले.या रूट मार्च, ड्रोन पाहणी व माईक साउंड अनाउंसमेंटमुळे परिसरात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

Popular Articles