spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पवनी-देवलापार परिसरात चोरट्यांच्या सुळसुळाट

◼️ तिन ठिकाणी मारला डल्ला

◼️ लाखो रुपयाच्या मुद्देमाल लंपास

रामटेक :- तालुक्यातील पवनी-देवलापार येथे चार दिवसात तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना समोर आलीय. यामध्ये तीन व्यावसायिकांच्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारलाय. दुकानात चोरट्यानं धुमाकूळ घालत लाखो रुपयाच्या मुद्देमाल लंपास केलाय. चोरट्यानी बियर बारमधून जवळपास २ लाख १८ हजारांचा मुद्देमालांवर डल्ला मारलाय. वाढत्या चोरीमुळे व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवलापार येथील जैन किराणा दुकान चोरट्यांनी शटर तोडून तब्बल नगदी ३ हजार रुपये तर तेलाचे डब्बे सह ३० हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना नुकतीच शुक्रवार (दि.२२) मे रोजी घडली आहे. त्याच मध्यरात्री देवलापार मधील ग्रीन पार्क रिसॉर्ट अँड बियर बार येथील स्वयंपाकघराच्या (किचन ) दरवाज्याची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून रोख रक्कम तब्बल १ लक्ष ३१ हजार तर महागड्या दारूच्या बाटल्या असा एकूण २ लक्ष १८ हजार ७६० रुपयाच्या मुद्देमालावर डल्ला मारून हात साफ केला. तर (दि.२५) मे रोजी पवनी येथील विवान मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स’ येथे मध्यरात्री दुकानाचे शटर तोडून दुकानातून मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, गल्ल्यात ठेवलेली रोख रक्कम, इतर साहित्य असा एकूण रुपये ६० हजार पेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल सोबत वैयक्तिक मोबाईल फोन सुद्धा चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे देवलापार आणि पवनी येथील व्यापारी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांची रात्रीची गस्त (नाईट पेट्रोलिंग) कमकुवत झाल्यामुळेच चोरटे बेधडकपणे फिरत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. किराणा दुकान, रिसॉर्ट अँड बार आणि मोबाईल दुकानामधील चोरीनंतर देवलापार पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस ) २०२३ च्या कलम ३३१ (४) आणि ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास देवलापार पोलीस करत आहेत. लवकरात लवकर अटक न झाल्यास युवराज आंदोलना च्या इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

Popular Articles