spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

समाजभान: आरोग्य शिबिर संपन्न, सुमारे आठशे लोकांनी घेतला लाभ, चष्मे वाटप

खापा, वार्ताहर :- शहरातील प्रसिद्ध तीर्थस्थान श्री कृष्णाजी महाराज मठ, कुंभारपुरा येथे भव्य आरोग्य रोग निदान शिबिर शुक्रवार (दि. २९ मे) रोजी संपन्न झाले. मंदिराचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक खेमाजी डेकाटे, सामाजिक कार्यकर्ते विनोद डेकाटे यांच्या संकल्पनेने तसेच ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, खापा, केदारनाथ बहुउद्देशीय विकास संस्था, खापा तसेच गौड विकास परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी जेष्ठ नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सुनील केदार यांची उपस्थिती राहिली. तर जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम येथील मानसोपचार तज्ञ डॉ. स्नेहल निंबोरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पियुष बुरडे, नगरसेवक संजय सोनकुसळे, निखिल आष्टनकर, छगन कवळे, मुन्ना शर्मा, नगरसेविका मनोरमा सरीयाम, कविता धराळे, वैशाली लाड इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र खापा, डॉ. दिक्षा भिरड, आपला दवाखाना खापा, डॉ. सौरभ आडोळे, नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर, खापा, डॉ. अंकिता बरेठिया, सामुदायिक आरोग्य अधिकारी सोनिया गायकवाड, पल्लवी गुप्ता, विकास महात्मे नेत्र रुग्णालय, नागपूर, येथील डॉ. अरविंद डोंगरावर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम येथील मानसोपचार तज्ञ डॉ. स्नेहल निंबोरकर, उडान जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी प्रविण काकडे, तालुका समन्वयक उडान अंकुश मंगळे, येथील तज्ञ डॉक्टर व कर्मचारी राजेश चन्ने, आरोग्य सेवक कुणाल वानखेडे, रोहित राऊत, प्रणाली बांबोळे, निलेश कुंभरे, निलेश राणे यांच्या सह चमूने आरोग्य सेवा दिली.

विकास महात्मे नेत्र रुग्णालय यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी करून आवश्यक त्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच आवश्यक त्या रुग्णांना योग्य ती शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे. शस्त्रक्रिये दरम्यान प्रवासाची संपूर्ण व्यवस्था सुद्धा रुग्णासाठी करण्यात आली. यानिमित्ताने डोळ्यांच्या शल्यक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना शनिवार ३० मे रोजी बँक ऑफ बडोदाच्या समोरील प्रांगण येथून रुग्णवाहिकेने विकास महात्मे नेत्र रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

या शिबिरामध्ये आवश्यक ती तपासणी, मानसोपचार, सामान्य रोग निदान (जनरल बॉडी चेकअप) आणि तज्ज्ञांचा मोफत सल्ला देऊन औषध वितरण करण्यात आले.

हे शिबिर यशस्वी होण्यासाठी केदारनाथ बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश तालपल्लीवार, उपाध्यक्ष शंकर गोखे, सचिव सुरेश मारोतकर, सहसचिव प्रकाश चौधरी, राजू ढेंगरे, सामाजिक कार्यकर्ते आनंद मेनकुदळे, मकसूद शेख, आदित्य डेकाटे, अनुप धकाते, लोकेश सुरकार, जितेंद्र डेकाटे, गोपाल सोनकुसळे संस्थेच्या आदी सभासदांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles