– सुवर्ण१३, रौप्य २५ व कांस्य ०८ असे ४६ पदक पटकाविले; कन्हान परिसरात जल्लोष
कन्हान :- रामटेक येथे आयोजित दोन दिवसीय सिलं बम स्पर्धेत शिवशंभु आखाडा कन्हान, कांद्री, टेकाडी व निलज येथील खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी करित तब्बल ४६ पदके पटकावित उल्लेखनीय यश संपादन केल्यान संपुर्ण कन्हान आणि परिसरात विजयी खेळा डुंवर जल्लोषात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
छत्रपती बहुउद्देशीय संस्था रामटेक, आमदार क्रीडा महोत्सव समिती तसेच शिवसेना मित्र परिवार व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथील गांधी चौकात दोन दिवसीय सिलंबम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेत शिवशंभु आखाडा च्या खेळाडुंनी प्रशिक्षक अनिकेत निमजे, गुंडेरावजी चकोले यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धेत सहभाग घेतला. कन्हान, कांद्री, टेकाडी व निलज येथिल खेळाडुंनी शिव काळीन कला, कौशल्या चे उत्कृष्ट आविष्कार सादर करित १३ सुवर्ण १३, रौप्य २५, आणि कांस्य ०८ पदके अशी एकुण ४६ पदके पटकाविल्याने स्पर्धे तील विजेत्या खेळाडुंना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. या स्पर्धेत भरघोस यश संपादन करून कन्हान परिसराचे नाव उज्ज्वल केल्याने खेळाडुंचे कन्हान शहरात आगमन होताच स्थानिक नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी, मिठाई वाटप करून जल्लोषात स्वागत करित अभिनं दन केले. शिवशंभु आखाडाच्या या यशस्वी कामगिरी मुळे परिसरातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असुन खेळाडुंनी कन्हान परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .



