spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आष्टी व खात येथील दिव्यांगांना मोटार ट्रायसिकलचे वाटप 

किशोर साहू, मौदा :- महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाकडून आष्टी येथील कोठीराम बावनकुळे तसेच खात येथील सुरेश क्षीरसागर यांना मोटार ट्रायसायकलचे वितरण नुकतेच करण्यात आले.

यावेळी माजी भाजपा मौदा मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल , माजी जिल्हा परिषद सदस्या राधा मुकेश अग्रवाल, उपसरपंच खात रविंद्र मांडरकर, सरपंचा घोटमुंढरी चंदा गेडाम, उपसरपंच आष्टी श्याम वाडीभासमे, बूथ प्रमुख खात ,सचिन समरीत, गणेश बावनकुळे तसेच मान्यवर उपस्थित होते.

मोटार ट्रायसायकल प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी कोठीराम बावनकुळे व सुरेश क्षीरसागर यांनी स्वतः भावना व्यक्त करत मंत्री बावनकुळे , राधा अग्रवाल तसेच मुकेश अग्रवाल यांचे मनःपूर्वक आभार मानले.

समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.

या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार , असे याप्रसंगी मुकेश अग्रवाल यांनी सांगितले.

Popular Articles